आरोग्य विषयी

    आपण अनेक वर्षे पिढ्यान पिढ्या आपण रोज तिन्ही सांजेच्या दिवाबत्ती नंतर आरोग्यम् धन संपदा हे म्हणत, वाचन,सांगत आणि ऐकत असतो तरी त्याबाबत मात्र आपण प्रत्यक्षात तेवढे तत्पर, दक्ष आणि काळजी घेतोय असे मात्र दिसत नाहीत.
    कारण वाढते दवाखाने, वाढते आजार, नव नवे रोग, त्रास हे पाहिले की अजूनही आपण म्हणावे तसे आरोग्याबाबत जागरूक आहोत असे म्हणता येत नाही.
    आपण आपले आरोग्य हे उत्तम प्रकारे राखायचे हे मात्र नक्कीच आपल्याच हातात आहे.
    उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, विहार आणि विवेकपूर्ण व्यवस्थितपणा राखणे हे फारच गरजेचे आहे. आपला दैनंदिन बिघडत जाणार आहार, वाहनांच्या उपलब्धतेमुळे कमी होत चाललेला विहार आणि आपल्या हातून विवेक पूर्ण घेतली जाणारी आरोग्याची काळजी ह्या तिन्ही गोष्टी ह्या आपल्या आरोग्याला कारणीभूत झाले आहेत.
    खरं म्हणजे उत्तम आहार, आवश्यक तेवढी निद्रा, आराम आणि विश्रांती आणि संयमपूर्वक राखलेले ब्रह्मचार्य ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच उत्तम आरोग्याची ठेव देतात. पण त्या गोष्टी कटाक्षाने पाळायला, घ्यायला आणि सांभाळायला हव्यात. उत्तम आरोग्यासाठी ह्या तिन्ही गोष्टींचे पालन ही एक अनिवार्य बाब आहे.
    जीवनामध्ये सुख समाधान आनंद हा मिळवण्यासाठी आपण धन-संपत्ती, पैसा हा जसा हर प्रयत्नाने, अथक कष्ट, मेहनत आणि परिश्रम करून मिळवतो.
त्याचप्रमाणे आहार, विहार, व्यायाम, काळजी, सावधानता, दक्षता इत्यादी गोष्टींवर पूर्ण लक्ष देऊन "मी उत्तम आरोग्य हे संपादन करीन व ते टिकून ठेवीन " असा निश्चय करणे हे आवश्यक आहे.